नगर तालुका (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील सारोळा कासार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात पार पडले. चिमुकल्यांच्या बहारदार कार्यक्रमाने ग्रामस्थांची मने जिंकली.बालकलाकारांनी ग्रामस्थांना सुमारे तीन तास खेळवून ठेवले. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांवर बक्षीस रूपी सुमारे १ लाख रुपयांची देणगी दिली.
या कार्यक्रमाची अध्यक्षस्थानी सरपंच आरती कडूस, प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विद्याताई धामणे, केंद्रप्रमुख उत्तम भोसले, अंबादास गारुडकर, माजी केंद्रप्रमुख किशोर हारदे, संजय आ.धामणे केंद्रप्रमुख आत्माराम धामणे, बापूराव झरेकर गुरुजी, शिक्षिका मीनाक्षी हिंगे, उषाताई धामणे, सुनिता लांडगे, ज्योती गोरे,रेश्मा गांगर्डे आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चेअरमन महेश धामणे, सुशील गट, संजय देवराम धामणे, अरुण काळे, रवी कडूस, ग्रामपंचायत सदस्य गजानन पुंड, रोहित काळे, सुजाता नगरे, शिवाजी लिंभोरे, स्वाती धामणे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष नाना पारधे, शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष सुभाष धामणे, शिक्षक नेते दत्तात्रय जाधव, प्रशांत दरोडे, श्रीरंग धामणे, सुनील धामणे, संतोष काळे, विजय धामणे त्याचप्रमाणे केंद्रातील शिक्षक शिक्षिका गावातील शिक्षक यांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, संभाजी महाराज थीम, लावणी नृत्य,बालगीते, हुंडा नको, आपलीच हवा बायकोने उपवास धरला, माझी आवडती शाळा, शैक्षणिक कार्यक्रम बालकलाकारांनी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मिशन आरंभ शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. इयत्ता चौथीचा निरोप समारंभ संपन्न झाला. आपल्या शाळेबद्दल संस्कृती धामणे व रुंजी हारदे यांनी अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व पालक यांनी फार मेहनत घेऊन सहकार्य केले. उपस्थित सर्वांना भोजनाची व्यवस्था पालकांकडून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक वैजीनाथ धामणे शाळेतील शाळेतील शिक्षक बाबासाहेब धामणे, सविता लोंढे, ज्योती धामणे, अंगणवाडी सेविका भारती धामणे, मंदाताई कडूस, सुनीता कोठुळे त्याचप्रमाणे पालक दीपक कडूस,नवनाथ धामणे, सचिन शिंगाडे, नवनाथ कडूस, ज्ञानेश्वर काळे, सतीश कडूस, किरण धामणे, मनोज धामणे, तन्मय कडूस, महावीर धामणे, महेश कडूस, अरिफ शेख, गणेश धामणे, सचिन कडूस, मोहन काळे, संजय राहिंज यांच्या मार्गदर्शना खाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योती कडूस व सौ वैशाली काळे तर शाळेची आत्तापर्यंतची यशोगाथा सादरीकरण संतोष कडूस यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली.

Post a Comment