प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा एका रात्रीसाठी लाखोंना सौदा, मुंबईत हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चा पर्दापाश
मुंबई - मुंबईतील गिरगाव येथील एका हॉटेलमध्ये धाड टाकून पोलिसांनी नुकतेच देह व्यापार करणारे रॅकेट उद्ध्वस्त केले. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली असून देह व्यापारात गुंतलेल्या अभिनेत्रींकडून एका रात्रीसाठी ग्राहकांकडून लाखो रुपये वसूल केल्याचं उघड झालं आहे. मराठी सिनेसृष्टीत काम करणाऱ्या एका महिला मेकअप आर्टिस्टच्या माध्यमातून गिरगाव परिसरात अभिनेत्रींकडून देह व्यापार करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता दोन अभिनेत्रींसह दलाल म्हणून काम करणाऱ्या महिला मेकअप आर्टिस्टला रंगेहाथ पकडण्यात आलं. या प्रकरणात आता नवनवे धागेदोरे समोर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरगाव येथील हॉटेलमध्ये देहव्यापाराचे हायप्रोफाइल रॅकेट सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवत आधी याबाबत खात्री केली. त्यानंतर एक महिला मेकअप आर्टिस्ट दोन अभिनेत्रींना घेऊन हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी देह व्यापारात सक्रिय असलेल्या अभिनेत्रींची सुटका केली आणि त्यांना या रॅकेटमध्ये ओढणाऱ्या मेकअप आर्टिस्टला ताब्यात घेत अटक केली आहे.
एका रात्रीसाठी लाखोंचा सौदा
मराठी सिनेसृष्टीत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत असलेल्या महिलेचा अनेक अभिनेत्रींशी संपर्क होता. यातील एक अभिनेत्री ही ग्रामीण महाराष्ट्रातून मुंबईत आली होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर नावलौकिक मिळवण्याचे सदर अभिनेत्रीचे स्वप्न होते. मात्र मागील काही महिन्यांपासून तिला काम मिळत नव्हते. अशातच आरोपी मेकअप आर्टिस्ट महिलेने तिला देह व्यापाऱ्याच्या काळ्या विश्वात ओढलं. या मेकअप आर्टिस्टने एका श्रीमंत ग्राहकाशी संपर्क साधत सदर मराठी अभिनेत्रीसह एका बंगाली मॉडेलच्या शरीराचा सौदा केला. एका रात्रीसाठी प्रत्येकी एक लाख असे दोन्ही अभिनेत्रींसाठी ग्राहकाकडून एकूण दोन लाख रुपये घेतले जाणार होते. मात्र पोलिसांनी वेळीच धाड टाकल्याने दोन्ही अभिनेत्रींची देह व्यापारातून सुटका करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या निमित्ताने अभिनय क्षेत्रातील भयानक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. काम मिळण्यातील अडथळे किंवा कमी कालावधीत जास्त पैशांचा हव्यास काही अभिनेत्रींना देहव्यापारासारख्या भयंकर विश्वात ढकलत असल्याचं उघड झाल्याने मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

Post a Comment