अहिल्यानगर जिल्ह्यात हवामान विभागाकडून २ दिवस पावसाचा 'यलो अलर्ट'


अहिल्यानगर - भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात आगामी दोन दिवस हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी २२ आणि २३ सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला असून, या कालावधीत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार २२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे.

२३ सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्याचा जोर वाढण्याचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ४० ते ५० किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहू शकतो. हवामानातील या बदलामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि सुरक्षितता बाळगावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. विजा चमकत असतील त्यावेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments