अहिल्यानगर
(प्रतिनिधी) - जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध काही होणार मतदारसंघांत
चुरशीच्या लढती रंगणार, याचे
चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. माघारीची मुदत जवळ येत
असतानाच शनिवारी (दि. १७) भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि महाविकास
आघाडीतील काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार निलेश लंके यांच्यात नगरच्या
शासकीय विश्रामगृहात बंद दाराआड बैठक झाली.
या
बैठकीला माजी आमदार भानुदास मुरकुटे, बाळासाहेब
हराळ, प्रताप शेळके यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरू जुळवाजुळव झाल्याची चर्चा रंगली आहे.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार लंके यांनी जिल्हा निवडणुकीत बँकेच्या
राष्ट्रवादी नव्या राजकीय समीकरणांची पॅनल उभे करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे
सांगितले. मात्र, अंतिम निर्णय
प्रत्येकजण
आपापल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट
केले. त्यामुळे विरोधी गट एकत्र येऊन पॅनल उभे करणार का, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, सभापती राम शिंदे हे जिल्हा बँकेतील विरोधी गटातील
इच्छुकांचे नेतृत्व करणार का, असा
प्रश्न माध्यमांनी उपस्थित केला. मात्र, शिंदे
यांनी या प्रश्नावर भाष्य करणे टाळले. त्यामुळे या बैठकीत नेमकी कोणती राजकीय
रणनीती ठरली, याबाबत तर्कवितर्क सुरू
झाले आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील माघारीच्या मुदतीसाठी आता दोन दिवस राहिले आहेत. २१ जागांसाठी २३९ जण रिंगणात होते. त्यापैकी १५ जणांनी माघार घेतली आहे. आज रविवारी (दि. १८) व मंगळवारी (दि. २०) दसरा या निमित्त सुट्टी आहे. त्यामुळे माघारीसाठीच्या राजकीय हालचालींसाठी फक्त सोमवार (दि. १९) व बुधवार (दि. २१) हे दोनच दिवस कळीचे ठरणार आहेत. बँकेच्या २१ पैकी नेवासे सोसायटी मतदारसंघात शंकरराव गडाख व संगमनेर सोसायटी मतदारसंघात रणजितसिंह देशमुख या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत.
शेवगावमध्ये चंद्रशेखर घुले व राजश्री घुले दाम्पत्यांचे आणि कोपरगावमध्ये
बिपीन कोल्हे व आ. विवेक कोल्हे या पिता-पुत्रांचे अर्ज राहिले आहे. यापैकी कोणी
एकाने माघार घेतली तर दुसरी जागा बिनविरोध होणार आहे. अकोले, पारनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर या सोसायटी मतदारसंघ यासह शेती पूरक व बिगर शेती
आणि महिला राखीव दोन जागांसह अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी व भटके विमुक्त राखीव या सात जागांवर निवडणूक अटळ
मानली जात आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी सव्वा एक वाजता नगरच्या शासकीय विश्रामगृहावर सभापती शिंदे यांचे आगमन झाले. यावेळी त्या ठिकाणी नगर तालुक्यातील इच्छुक बाळासाहेब हराळ, प्रताप शेळके,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा.सीताराम काकडे उपस्थित होते. त्यानंतर खा. नीलेश लंके त्या ठिकाणी हजर झाले.
सुरूवातीला सभापती शिंदे आणि लंके यांच्या गुप्त झाल्यावर शिंदे, लंके, हराळ, शेळके, संपतराव
म्हस्के यांनी बंद दाराआड बैठक सुरू केली. काही वेळाने या ठिकाणी ज्येष्ठ नेते तथा
माजी संचालक भानुदास मुरकुटे आले. त्यानंतर ते देखील बैठकीत सहभागी झाले. यावेळी
जिल्हा बँकेबाबत बंद दाराआड खुली चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Post a Comment