मुंबई – महाराष्ट्रातील काही भागांमध्ये
वातावरणात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यभरातील
नागरीक गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यामुळे अचानक
पावसाचे आगमन होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाकडून अनेक
जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी
वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किती इतका राहण्याची शक्यता आहे. तर
काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे.
12 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
हवामान
विभागाकडून 19 ऑक्टोबरसाठी 12 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील
जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक
ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा
गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग हा
ताशी 40 ते 50 किमी इतका राहण्याची शक्यता आहे.
आणखी
कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
पुणे जिल्हा आणि पुणे घाट परिसरातही 19 ऑक्टोबरला वादळी पावसाची शक्यता आहे. इथे देखील वाऱ्याचा वेग हा प्रतितास 40 ते 50 किमी इतका राहण्याची शक्यता आहे. याशिवाय कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर घाट परिसर, सातारा जिल्ह्या, सातारा घाट परिसर, सांगली, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याच वेग हा ताशी 30 ते 40 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे. तर धाराशिव जिल्ह्यात 40 ते 50 किमी प्रतितास वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून 19 ऑक्टोबरसाठी विदर्भातील गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यासाठीदेखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
20 ऑक्टोबरला 3 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
हवामान विभागाकडून 20 ऑक्टोबरसाठी राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोल्हापूर घाट परिसर, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दिवशी इतर ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, 19 ऑक्टोबरला अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
20 ते 25 ऑक्टोबर काळात राज्यात पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज
हवामान
तज्ज्ञ पंजाबराव डख यांनीदेखील राज्यातील पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.
"राज्यात 20 ते 25 ऑक्टोबर या काळात परतीचा पाऊस येणार आहे. हाच पाऊस
रब्बीच्या पेरणीचा निवाडा करणार आहे. 18 तारखेपासून
वातावरणात बदल होईल. 19 तारखेपासून
वातावरणात बराच बदल झालेला दिसेल. पण 20 तारखेपासून
म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे. हा पाऊस रब्बीच्या
पिकांसाठी निर्णायक ठरणार आहे", असा
अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

Post a Comment