मुंबई
- अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर अज्ञात आरोपींनी गोळीबार करत मोठा हल्ला
केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. या संदर्भातील एक ऑडिओ
क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमधून सलमान खानलादेखील धमकी देण्यात आली आहे.
बॉलिवूड
अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर हल्ला झाला आहे. मुंबईच्या जुहू येथे टायगर
श्रॉफच्या गाडीवर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला. आरोपींनी यावेळी सात ते आठ राऊंड
फायर केले. घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात प्रचंड
धावपळ झाली. यावेळी आरोपींनी सात ते आठ राऊंड फायर केल्याचा आवाज व्हिडीओत येत
आहे. या घटनेत टायगर श्रॉफ हा थोडक्यात बचावला आहे. गोळीबारात गाडीच्या काचा
फुटल्या आणि त्या शरिरात गेल्याने तो जखमी झाला आहे. तर त्याच्या कारचालकाच्या
हाताला गोळी लागली आहे. तसेच यावेळी परिसरातील एका रिक्षाचालकाच्या हाताला गोळी
लागली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
संबंधित
घटना ही जुहू पोलीस ठाण्यासमोरच्या गल्लीत घडली आहे. या गल्लीत जमुनाबाई नर्सरी
स्कूलचे प्लेग्राउंड आहे. इथे फुटबॉल खेळून टायगर घरी परतत होता, अशी माहिती आहे. याच
दरम्यान त्याच्या गाडीवर गोळीबार झाला. आरोपी गोळीबार करुन तिथून पळून गेले.
यानंतर स्थानिकांनी तातडीने जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती
मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा केला जातोय.
तसेच पोलीस आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. आरोपींचा युद्ध पातळीवर शोध सुरु
आहे.
बिश्नोई
गँगने घेतली हल्ल्याची जबाबदारी
या
घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट समोर आली आहे. या पोस्टमधून बिश्नोई गँगकडून या
हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या
व्यक्तीकडून आपण लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ असल्याचा दावा करण्यात आला आहे. या
संदर्भात एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमधून अभिनेता सलमान खानलादेखील
धमकी देण्यात आली आहे.
ऑडिओ
क्लिपमध्ये आरोपीने नेमकं काय म्हटलंय?
"रामराम
जी! मी अनिल पंडित, लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ. मुंबईत आज
जे अभिनेता टायगर श्रॉफ चे काम झाले आहे त्याची जबाबदारी मी अनिल पंडित आणि माझा छोटा
भाऊ दोघं घेत आहोत. आम्ही टायगरला समजावलं होतं पण त्याला समजलं नाही. पूर्ण
चित्रपटसृष्टीत जो कुणी आमच्याशी वेगळं होऊन काम करणार किंवा सलमान खान सोबत मिळून
काम करणार त्याला आम्ही संपवून टाकू. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. या सलमान
खान दाऊचा कुत्रा आहे आणि दाऊद नावचा कुत्रा आम्ही घरात पाळला आहे", असं अनिल पंडित नावाचा व्यक्ती ऑडिओ
क्लिपमध्ये बोलतोय.
सलमान
खान लक्षात घे. तु माझा मोठा भाऊ लॉरेन्स बिश्नोई आणि बिश्नोई समाजाची माफी
मागितली नाही तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकू. तुला असं वाटतं की तू
सेक्युरिटीमध्ये आहे. तुझं काही होणार नाही. तुझी सुरक्षेत अशी अवस्था करु की, पूर्ण जग लक्षात ठेवेल.
तू सुद्धा तयार राहा. थोडा टाईम लागेल. पण नंबर सर्वांचा येईल", अशी धमकी या ऑडिओ
क्लिपमधून देण्यात आली आहे.

Post a Comment