अहिल्यानगर - पुणे विभागीय शालेय कराटे स्पर्धेत नगरचा कराटेपटू इब्राहिम तय्यब शेख याने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले असून, त्याची राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे मुकुंदनगर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
१४ वर्षाखालील वयोगटातील कुमिते गटात ५० किलो वजनाखालील गटात इब्राहिमने आपल्या दमदार पंच आणि किक तंत्राच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकावर नाव कोरले.इब्राहिम हा मुकुंदनगर यशवंत गाडे माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी असून, मुख्याध्यापिका संगीता बनकर यांनी त्याला मार्गदर्शन केले.
युथ कराटे अकॅडमीचा विद्यार्थी असलेल्या इब्राहिमला प्रशिक्षक सबिल सय्यद आणि साहिल सय्यद यांच्या प्रशिक्षणाचा लाभ झाला आहे. इब्राहिमचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे , सचिव प्रा. शशिकांत गाडे,सहसचिव रमाकांत गाडे , उपाध्यक्ष एम.पी.कचरे, खजिनदार संजय गाडे व संचालकांनी अभिनंदन केले.

Post a Comment