नगर - नगर पुणे महामार्गालगत नारायणगव्हान (ता. पारनेर) शिवारात १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास एका २५ ते ३० वयोगटातील अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. हा अपघात आहे की घातपात याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
नारायणगव्हाण येथे महामार्गापासून १०० मीटर अंतरावर एका तरुणाचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. त्यांनी याबाबत सुपा पोलिसांना माहिती दिली. सुप्याच्या पो.नि. ज्योती गडकरी यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
मयताची उंची अंदाजे ५ फुट ५ इंच, रंग गोरा, केस कुरळे, अंगावर : प्रिंटेड गुलाबी रंगाचा फुल बाहीचा शर्ट व काळ्या रंगाची आरमानी पॅन्ट, तसेच विशेष खूणा -डाव्या कानाखाली “आई” असे गोंदलेले, उजव्या हातावर “क्षत्रिय कुलवंतस” व गणपतीचे टॅटू, उजव्या हातावर लाल व भगव्या रंगाचे दोरे,उजव्या व डाव्या पायाच्या अंगठ्या, डाव्या पंज्याजवळ जखमेची जुनी खुण आढळून आली. मात्र त्याची ओळख पटेल असे काही सापडले नाही.
पोलिसांनी या मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सदर व्यक्ती बाबत कोणाकडे काही माहिती असल्यास अथवा मिसिंग असल्यास, कृपया तात्काळ सुपा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी (मो. 97638 90223)यांनी केले आहे.

Post a Comment