अहिल्यानगर -प्रो कबड्डी संघात अहिल्यानगरच्या संघाने नेतुत्व करत चांगली कामगिरी केली. कबड्डी खेळामुळे अहिल्यानगरचे नाव देशपातळीवर गेले, कबड्डीच्या खेळाडूंनी जिद्व व चिकाटीने खेळ केला तर यश नक्की मिळते असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी केले.
३६ व्या किशोर किशोरी गट मुले व मुली राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा राकेश भाऊ क्रीडांगण पुणे येथे ५ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडल्या. अंतिम सामना मुली आहिल्यनगर विरुध्द पुणे ग्रामीण यांच्यात झाला अहिल्यानगर उपविजेता ठरला. मुलांचा संघ तृतीय क्रमांकांनी विजयी झाला. विजयी संघाचा माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या वेळी हौशी कबड्डी संघटना जिल्हाध्यक्ष खासदार निलेश लंके, सचिव प्रा. शशिकांत गाडे, प्रकाश बोरुडे, विजय मिस्किन, कैलास पठारे, शंतनू पांडव, बाळासाहेब कडूस उपस्थित होते.
सन्मान केलेल्या खेळाडूंमध्ये किशोर गट मुली - कर्णधार श्रेया अडसूळ, फौजीया शेख, मिरा ठोंबरे, ज्ञानेश्वरी ढवन, वैष्णवी होटकर, आदिती शिरसाठ, खुशी कोंडा, निशा फंड, कादंबरी मोढवे, श्रेया तांबे, आराध्या जाधवर, वैष्णवी मानवर, आकांक्ष जाधव, भाग्यश्री ढवळे. मुलाचा संघ -समर्थ हेनुडे, अभिषेक साळवे, भरत खाटीक, साईराज तागड, रुद्र लोंखडे, साई लाटे, शुभम सोंडगे, नौतिक वतारे, चैतन्य वाखुरे, कार्तिक म्हस्के, आनंद कवडे, संस्कार सप्रे, ओबलेश जगताप, पार्थ आजबे. यांचा समावेश आहे.
यातील श्रेया आडसूळ, फौजीया शेख, ज्ञानेश्वरी डवण,वैष्णवी होटकर तसेच सार्थ हेलुडे, साईराज तागड, रुद्र लोंखडे, नौतिक वतारे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली या राष्ट्रीय स्पर्धा हरियाणा येथे २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहेत. यावेळी संघ प्रशिक्षक अमोल धानापूर्व, विनायक भुतकर, संघ व्यवस्थापक रितेश घोडके, राहुल आगळे व पालक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment