इस्टेट एजंटची दादागिरी... व्यावसायिकाला मारहाण करत मागितली खंडणी


अहिल्यानगर - मै जिसे बोला उसे फ्लॅट बेचने का और मुझे २ लाख रुपये देनेका नही तो हात पैर तोड डालुंगा अशा शब्दात फर्निचर दुकानदारास धमकावत एका इस्टेट एजंट ने मारहाण केल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास कापड बाजारातील लोकसेवा हॉटेल समोर घडली. या प्रकरणी त्या इस्टेट एजंटवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत यासर फिरोज तांबटकर (वय ३९, रा. शहाजीरोड, घासगल्ली) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घास गल्ली शहाजी रोड येथे बॉम्बे फर्निचर नावाचे दुकान आहे. तसेच त्यांचे घास गल्ली येथे असलेले २ फ्लॅट विकायचे असल्याने ते गिऱ्हाईक पाहत होते. २५ डिसेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास फिर्यादी हे कापड बाजारातील लोकसेवा हॉटेल येथे असताना इस्टेट एजंट म्हणून काम पाहणारा इकराम नजीर तांबटकर (रा. घास गल्ली, शहाजी रोड) हा तेथे आला व फिर्यादीला म्हणाला की तुम्हारा शहाजी रोड का फ्लॅट बेचने के लिये मैने पार्टी देखी है. त्यावर फिर्यादी त्यास म्हणाले की, तेरे कहने पर मै क्यु किसीको फ्लॅट बेचुंगा.

असे म्हणाले असता इकराम याला त्याचा राग आला व मै जिसे बोला उसे फ्लॅट बेचने का और मुझे २ लाख रुपये देनेका नही तो मै फ्लॅट बेचने नही दुंगा असे तो म्हणाला. त्यास नकार देताच त्याने फिर्यादी यांना हाताने मारहाण सुरु केली. मुझे २ लाख रुपये देनेका नही तो हात पैर तोड डालुंगा अशी धमकी त्याने दिली. यावेळी फिर्यादी यांचे भाचे हमजार खान व सलमान खान यांनी त्यांना सोडवले. त्यावेळी इकराम तांबटकर याने फिर्यादी यांना शिवीगाळ करत तुझसे तो मै २ लाख लेके रहूंगा अशी धमकी दिली.  या फिर्यादी वरून पोलिसांनी इकराम तांबटकर याच्या विरुद्ध बीएनएस कलम ३०८ () प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे


 

0/Post a Comment/Comments