दुर्दैवी घटना...अभियंता तरुणाने घरात गळफास घेत संपवले जीवन


नगर तालुका (प्रतिनिधी) - अभियंता असलेल्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील अकोळनेर गावात २५ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. विकास रावसाहेब गारुडकर (वय ३२, रा. अकोळनेर, ता.नगर) असे या मयत तरुणाचे नाव आहे.

विकास याने राहत्या घरात गळफास घेतल्याचे सकाळी निदर्शनास आल्यावर त्याचा चुलत भाऊ रोहन बाळासाहेब गारुडकर याने त्यास रुग्णवाहिकेतून नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश लोखंडे यांनी त्यास तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबतच्या अहवालावरून नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ.खरात हे करत आहेत.

मयत विकास याचे पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगी, ३ बहिणी असा परिवार आहे. त्याचे वडील रावसाहेब गारुडकर हे माजी सैनिक असून अकोळनेर ग्रामपंचायतचे सदस्य आहेत.   


 

0/Post a Comment/Comments