शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाद्वारे आमदार दाते सरांनी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅबचे उद्घाटन झाले असले तरी पदभरती व तांत्रिक प्रक्रियेमधील विलंबामुळे सेवा सुरू न झाल्याचे लक्ष वेधले. धुळे व बीड येथे कॅथलॅब कार्यान्वित झाल्या आहेत, मात्र अहिल्यानगरसह पुणे जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅब अद्याप सुरू न होणे हा गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार काशिनाथ दाते यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे प्रलंबित कॅथलॅब सुरू करण्यात येणाऱ्या विलंबावर सरकारचे लक्ष केंद्रीत झाले असून, परिशिष्ट क्षेत्रातील रुग्णांना तातडीने आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पुढील कार्यवाही गतीमान होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्यातील एकूण २३ कॅथलॅब मंजूर असुन, अहिल्यानगर कॅथलॅबचे AERB Registration व Swab testing सुरू असून त्या प्रक्रिया पूर्ण होताच कॅथलॅब सुरू होईल, तसेच पुणे, जालना, नांदेड व कोल्हापूर येथे टर्न-की पद्धतीवर कॅथलॅब सुरू करण्यासंबंधी सुधारित प्रशासकीय मान्यता प्रक्रियेत आहे. - ना. प्रकाश आबिटकर (सार्वजनिक आरोग्य मंत्री)

Post a Comment