अहिल्यानगर मध्ये पारा घसरला, राज्यात सर्वात निच्चांकी तापमानाची झाली नोंद

 


अहिल्यानगर - राज्यात कडाक्याची थंडी सुरू झाली असून गत पाच वर्षात २०१९ नंतर सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली. ११ डिसेंबरला (गुरुवारी) अहिल्यानगरचे किमान तापमान राज्यात सर्वात कमी ६.६ अंशावर खाली आले होते. तर १२ डिसेंबर रोजी सकाळी किमान तापमान ७.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. ते राज्यातील थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर पेक्षा तब्बल ५ अंशांनी कमी आहे. महाबळेश्वर चे किमान तापमान १२.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर भारतातून झोतवारा (हवेच्या वरच्या थरातील थंड वारे) वेगाने महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील किमान तापमानात ५ ते ७ अंशांनी घट झाली आहे. ११ डिसेंबरला राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान १० अंशाच्या खाली गेल्याने राज्याला हुडहुडी भरली. समुद्रासपाटीपासून दहा ते पंधरा हजार फुट उंचीवर वाऱ्याच्या वरच्या थरात गारवारे वेगाने वाहण्यास सुरुवात झाली आहे. ते वारे उत्तर भारतातून महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झाली आहे. हे वारे खालच्या थरांत आले आहे.

त्यामुळे राज्य गारठून पारा ५ अंश सेल्सिअस इतका खाली आला. त्यामुळे २०१९ नंतर सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. १२ डिसेंबर रोजी नगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जेऊर (ता.करमाळा) येथे राज्यातील सर्वात कमी ५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्या खालोखाल जळगाव, ., नगर ७., नाशिक ७., पुणे ८., मालेगाव ८., सातारा ९., छत्रपती संभाजीनगर १०., धाराशिव १०., परभणी १०., महाबळेश्वर १२.२ अंश सेल्सिअस असे तापमान नोंदवले गेले आहे.

यंदा नोव्हेंबर महिन्यातच थंडीचा कडाका वाढला होता. १७ नोव्हेंबर ला नगरचे किमान तापमान ९ अंशावर गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (१८ नोव्हेंबर) ला यात पुन्हा घसरण होऊन किमान तापमान ८ अंशावर गेले होते. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला होता, त्यानंतर मात्र सेनियारदिटवाचक्रीवादळामुळे किमान तापमान वाढले असतानाच ढगाळ वातावरणामुळे थंडीत घट झाली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशीच शहराचे किमान तापमान ९ अंशावर गेले होते. त्यानंतर पुढचे ४ दिवस थंडीचा कडाका कायम होता. मात्र ५ डिसेंबरपासून पुन्हा किमान तापमानात किंचित वाढ झाली होती. त्यामुळे थंडी काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र ८ डिसेंबरपासून पुन्हा थंडीत वाढ होऊ लागली होती. गेल्या २ दिवसांपासून थंडीची तीव्रता आणखी वाढली आहे.

राज्यात काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट

राज्यातील वाढत्या थंडीमुळे हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड परिसरांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, गोंदिया, वर्धा अशा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरेकडील लहरींचा वेग वाढत असल्याने पुढील काही आठवड्यांत तापमानात आणखी मोठी घसरण होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ला निनो, या हवामान प्रक्रियेच्या प्रभावामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने राज्यासाठी सर्वाधिक थंड ठरण्याची शक्यता आहे. हवामान बदलाचा परिणाम राज्याच्या सर्व भागात स्पष्टपणे दिसत असून, शेतकरी आणि सर्वसामान्यांनी सावधगिरी बाळगावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.


 

0/Post a Comment/Comments