गोरे दिसण्यासाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने केली ट्रीटमेंट?



नवी दिल्ली; यूट्यूबर ध्रुव राठीने अलीकडेच रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटावर जोरदार टीका केली होती. चित्रपटाला प्रोपोगंडा असल्याचे म्हटले होते. आता त्याने अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने गोरे दिसण्यासाठी स्किन लाइटनिंग ट्रीटमेंट केल्याचा दावा केला आहे. ध्रुव राठीने यूट्यूब चॅनेलवर ‘द फेक ब्यूटी ऑफ बॉलीवूड सेलिब्रिटीज’ या नावाने एक नवीन व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने दीपिका पादुकोणसह काजोल, बिपाशा बसू, प्रियांका चोप्रासारख्या अनेक अभिनेत्रींनी कॉस्मेटिक सर्जरी केल्याचा दावा केला आहे.

व्हिडीओमध्ये ध्रुव म्हणतो, ‘ज्याचं सौंदर्य तुम्ही ईश्वराची देणगी मानता, ती खरंच डॉक्टरांची देणगी बनलेली आहे.’ त्यानंतर तो नोज जॉब, लिप फिलर्स, फॅट रिमूव्हल, जॉ लाईन ऑग्मेंटेशन, फेस लिफ्ट, बोटॉक्स इत्यादी कॉस्मेटिक प्रोसिजरची माहिती देतो. काही अभिनेत्रींच्या करिअरच्या सुरुवातीस त्यांचा रंग सावळा होता; पण आता त्या गोर्‍या दिसतात. काही अभिनेत्री स्किन व्हाइटनिंग क्रीमच्या जाहिराती करतात; परंतु ग्लूटाथिओन इंजेक्शन स्किन लाइटनिंगसाठी अभिनेत्रींमध्ये लोकप्रिय आहे.

हा व्हिडीओ दि. 25 डिसेंबर 2025 रोजी यूट्यूबवर पोस्ट केल्यानंतर रेडिटवर वायरल झाला. दीपिकाचे फॅन्स लगेचच तिचा बचाव करताना म्हणाले की, ‘लाइटिंग आणि एडिटिंगमुळे रंग हलका दिसतो; मला वाटत नाही की, तिने ट्रिटमेंट केली आहे.’ काही फॅन्सनी तिच्या बालपणीचे फोटो दाखवत म्हटले की, दीपिका मूलतः मीडियम स्किन टोनची होती आणि 2000च्या दशकातील टॅनिंग ट्रेंड फॉलो करत होती, जसे ऐश्वर्याने ‘धूम 2’ साठी केले होते.


 

0/Post a Comment/Comments