मुंबई (प्रतिनिधी) – अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कामासह
खास कवितांमुळेही चर्चेत येतो. संकर्षण मनोरंजन विश्वात सूत्रसंचालक, अभिनेता, कवी, दिग्दर्शक
आणि लेखक अशा विविध जबाबदारी शिताफीने हाताळतो. त्याच्या कवितांचे तर चाहत्यांकडून
विशेष कौतुक होते. त्यामुळे 'संकर्षण व्हाया स्पृहा' हा
त्याचा कवितांचा कार्यक्रम खूप लोकप्रिय ठरला. संकर्षण आणि स्पृहा जोशी या
हरहुन्नरी कलाकरांच्या खास कविता या कार्यक्रमात ऐकायला मिळतात. अलिकडेच या
कार्यक्रमात संकर्षणने त्याची नवीन कविता सादर केली. अभिनेत्याने ही कविता सोशल
मीडियावर शेअर केली असून ती काहीच तासांत चांगलीच व्हायरल झाली.
संकर्षणने या व्हिडीओत म्हटल्यानुसार, अनेकदा
या कलाकारांना काही भन्नाट चाहते भेटतात आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया फारच
मजेशीर असतात. अशाच एका चाहत्याच्या प्रतिक्रियेवर आधारित कविता संकर्षणने रचली असून, ती
त्याने सोशल मीडियावर शेअर केली. 'चारचा चहा घेत असाल तर नवीन कविता ऐकत
घ्या… कळवा चहा कशी झाली आहे', असे कॅप्शन देत संकर्षणने ही कविता शेअर
केली.
काय आहे संकर्षण कऱ्हाडेची ही नवीकोरी वाफाळणारी कविता?
परवा एक जण भेटले, म्हणले हे काय बरोबर नाय...
हल्ली कविता इन्स्टाग्रामला टाकली नाही, काय
सुचत नाही की काय...
पेटून उठल्यासारखा मी एका जागी बसलो, कागद-पेन
घेऊन एकदम साहित्यिकाच्या भूमिकेत घुसलो…
एकही शब्द
मदतीला माझ्या धावून नाही आला, कशावर लिहावी कविता या विचारात बराच
वेळ गेला...
राग काढत
बायकोला म्हटलं जरा बायकोसारखी वाग, नवरा केव्हाचा लिहायला बसलाय... कपभर
चहा तरी टाक…
ती म्हणाली
फाडलेल्या पानांचे किती बोळे झालेत पाहा आणि कवितेच्या नावाखाली सकाळपासून 13 कप
झालाय चहा…
बायकोचा हा बाण
माझ्या काळजात घुसला, ताजा-ताजा कवितेसाठी विषय मला सुचला…
म्हणलं आता काय
लिहितो ते तुम्ही फक्त पाहा,
कवितेचा विषय
आहे... सगळ्यांच्या आवडीचा 'चहा'
चढायचा असेल
पर्वत तर माणूस कमरेतून वाकावा लागतो आणि हवा असेल चहा तर आधी तो आपल्याला टाकावा
लागतो…
चहा
पिणाऱ्यांपेक्षा हल्ली विकणारेच वाढलेत...
उद्योग
नसल्यासारखे त्या चहाचे शेकडो प्रकार काढलेत...
आल्याचा, गुळाचा, साखरेचा, गवताचा...
पंढरपूरचा, येवल्याचा, टपरीचा, चुलीवरचा...
बार्बीक्यू, बासुंदी, टिपटिप, इराणी...
मटका, काळा, कम
दूध, ज्यादा
पाणी...
बरं क्रिकेट या
खेळाशीसुद्धा चहाचा संबंध दिसतो, तिथेही कॉफी नाही तर टी-टाइम असतो…
राजकारणातही चहा
करतो मनोमिलनाचं काम, जे प्यायला विरोधकही येतात ते असतं
चहापान...
बरं चहा
पिणाऱ्यांची लागे तंद्री तो पावे अंतर्धान... आणि मन लावून चहा विकणारा होतो
पंतप्रधान...
आता इतक्या भारी
पेयाला हलक्यात कसं घ्यावं?
जवळच्यांना जवळ
घ्यावं आणि चहाच प्यायला बसावं...
नाही नाही
म्हणता म्हणता मला चहावर कविता सुचली हो, तिकडून चहाचा कप घेऊन येणारी बायको
मला दिसली हो...
चौदावा चहा देत
ती म्हणाली की, 'अजून किती देऊ?'
तिला म्हणलं, 'हाच
चहा आपण अर्धा अर्धा पिऊ...'
तिला म्हणलं, 'हाच
चहा आपण अर्धा अर्धा पिऊ...'

Post a Comment