स्मृती मानधनाचा षटकार होता की आगीचा गोळा, चेंडू कुठे गेला हे कळलंच नाही



विशाखापट्टणम : भारताने दुसऱ्या टी २० सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय साकारला. शेफाली वर्माने या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावले आणि भारताचा विजय तिने सुकर केला. पण शेफालीच्या खेळीपेक्षा सर्वात जास्त चर्चा सुरु झाली आहे ती स्मृती मानधनाच्या षटकाराची. कारण स्मृतीने यावेळी असा दमदार षटकार खेचला की, त्याला तोडच नव्हती. यावेळी हा चेंडू बॅटवर आल्यावर नेमका कुठे गेला हे समजलेच नाही. स्मृतीच्या या षटकाराचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

ही गोष्ट घडली ती तिसऱ्या षटकात. त्यावेळी श्रीलंकेची मल्की मदारा यावेळी गोलंदाजी करत होती. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ही गोष्ट पाहायला मिळाली. स्मृती मानधना यावेळी फलंदाजी करत होता. स्मृती मानधनाने या चेंडूवर फटका मारला पण त्यावर धाव आली नाही. पण हा चेंडू नो बॉल असल्याचे समोर आले. त्यामुळे स्मृती मानधनाला फ्री हिट मिळाली होती. आता गोलंदाज मल्की कशी गोलंदाजी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण मल्कीने यावेळी वाईड चेंडू टाकला. त्यामुळे पुन्हा फ्री हिट कायम होता. त्यानंतर पुन्हा मल्की गोलंदाजीला आली आणि तिने पुन्हा एकदा वाईड चेंडू टाकला. मल्की यावेळी स्मृतीला घाबरली की काय, अशी चर्चा सुरु झाली होती. पण त्यानंर मल्कीने योग्य चेंडू टाकला जो स्मृतीच्या बॅटवर आला.

स्मृती यावेळी मोठा फटका मारण्यासाठी सज्ज असल्याचे पाहायला मिळाले. मल्कीने टाकलेला बॉल जसा पीचवर पडला तशी स्मृती ही पुढे झाली आणि तिने हा चेंडू योग्यपणे बॅटवर घेतला. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्मृतीचे या चेंडूवर टायमिंग एवढे अप्रतिम होते की, हा चेंडू स्मृतीच्या बॅटवर आला खरा, पण त्यानंतर हा चेंडू हवेत कुठे गायब झाला हे काही काळ समजले नाही.

स्मृतीने मारलेला हा चेंडू जेव्हा सीमारेषेच्या पार गेला, तेव्हा सर्वांना चेंडू दिसला. त्यावेळी पंचांनी हा षटकार असल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर तिच्या या फटक्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. स्मृतीला या सामन्यात जास्त धावा करता आल्या नाहीत, पण स्मृतीचा हा षटकार मात्र सर्वांच्या लक्षात नक्कीच राहील.



0/Post a Comment/Comments