नगर तालुका (प्रतिनिधी) -राज्यात भाजपा महायुतीचे सरकार चांगले काम करत आहे. राज्यातील लोकोपयोगी विकास कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य दिले आहे. नगर - श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांना वरदान ठरणारी 'साकळाई' योजना पुर्ण करणार असून आगामी काही दिवसातच योजनेच्या कामाचा शुभारंभ करणार असल्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या वाळकी गटात गेल्या पंधरा वर्षात रखडलेली विकास कामे मार्गी लावायची असतील तर वाळकी गटातील जनतेनी लोकसभा निवडणुकीत केलेली चुक पुन्हा करू नका. वाळळी गटात भाजपा महायुतीचा झेंडा फडकवा असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पालकमंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील यांचा नियोजित जामखेड दौरा असताना त्यांनी वाळकी ( ता . नगर ) येथे भेट दिली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात वाळकी गटातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जेष्ट नेते विनायक देशमुख, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे, माजी सभापती अभिलाष घिगे, रेवणनाथ चोभे, संतोष म्हस्के, तालुकाध्यक्ष दिपक कार्ले, राम पानमळकर, दादासाहेब दरेकर, सरपंच शरद बोठे, धर्मराज शैक्षणिक संस्थेचे सचिव विक्रम कासार, संजय गिरवले, रमेश भांबरे, प्रशांत गहिले, यासीनभाई शेख, प्रभाकर बोरकर, दादाभाऊ चितळकर, भाऊसाहेब लांडगे, बाजीराव हजारे, अशोक कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य ओंकार निमसे, विकास कासार, राम कासार, महादेव कासार, प्रथमेश भालसिंग, गणेश धोंडे, भाऊसाहेब भालसिंग, संदीप बोठे, अक्षय भालसिंग, दादासाहेब बोठे, गणेश भालसिंग, संदीप जाधव, विक्रम भालसिंग, शिवाजी लोखंडे, बाळासाहेब जाधव, आदिंसह वाळकी गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ना. विखे पाटील म्हणाले की, आगामी होणाऱ्या जिल्हापरिषद , पंचायत समिती निवडणूकीत भाजपा महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. लोकसभेला झालेल्या चुकांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ देऊ नका. ' साकळाई ' योजना मार्गी लागणारच आहे. वाळकी गटात परिवर्तन होणे गरजेचे असून गटातील जनतेने भाजपाच्या पाठीमागे उभे रहावे. विकास कामे मार्गी लावण्याची जबाबदारी असेल असे ना. विखे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ
नगर - श्रीगोंदा मतदार संघातील ३५ गावांचा पाणीप्रश्न सोडवून हजारो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणण्यासाठी साकळाई योजना महत्वाची आहे . ही योजना मार्गी लावण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. येत्या काही दिवसातच या योजनेच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

Post a Comment