अहिल्यानगर - महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच मुकुंदनगर परिसरात कार्यकर्त्यांमध्ये वाद पेटला आहे. एका युवकाने सोशल मीडियावर एका उमेदवाराच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने त्याच्या डोक्याला बंदूक लावून डोक्यात चॉपरने वार केल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात तणावनिर्माण झाला होता. या प्रकरणी सहा ते सातजणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्रार मुक्तार शेख (वय २३, रा.आलमगीर, भिंगार) असे जखमी युवकाचेनाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या जबाबावरून अफजल आसीर शेख (अफजल पैलवान) आणि अस्लम आसीर शेख (अस्लम पैलवान) या दोघांसह चार ते पाच अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंदवला आहे. जखमी अब्रार याने एका उमेदवाराच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेटस ठेवले होते.
तो शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून मुकुंदनगर भागातून जात असताना अल अमीन ग्राऊंडसमोर गर्दीमुळे थांबला. यावेळी जमावातील एकाने त्याला गाडीवरून खाली ओढले. त्यानंतर अफजल शेख आणि अस्लम शेख यांनी तिथे येऊन अब्रार यांना मारहाण केली.अफजल याने डोक्याला बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी दिली. तर, अस्लम याने चॉपरने डोक्यावर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर मुकुंदनगर परिसरा तणाव निर्माण झाला होता.

Post a Comment