मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी अहिल्यानगरमध्ये जाहीर सभा


अहिल्यानगर -  महानगरपालिका निवडणूकीतील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगरमध्ये येत आहेत. गुरुवारी ८ जानेवारी रोजी त्यांची शहरात जाहीर सभा होणार आहे. शहरातील मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील पांजरपोळ मैदानात दुपारी १ वाजता ही जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी दिली.

अधिक माहिती देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले, मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, .संग्राम जगताप, माजी खासदार डॉ.सुजय विखे हे उपस्थित राहणर आहेत. या सभेसाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

या सभेच्या स्थळाची पाहणी ७ जानेवारीला सकाळी माजी खासदार डॉ.सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नितीन कुंकूलोळ, विकी जगताप आदी प्रमुख नेत्यांनी केली.

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहोत. युतीच्या सर्व उमेदवारांसाठी अतिशय चांगले वातावरण निर्माण झाले असून नागरिक उस्पर्तपणे सर्व उमेदवारांना प्रतिसाद देत आहेत. युतीचे ५ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने युतीने या निवडणूकीत आघाडी घेतली आहे. ही आघाडी अशीच पुढे कायम राहील.

अनिल मोहिते म्हणाले, पांजरपोळ येथील मैदानात होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून सुमारे पंधरा ते वीस हजार नागरिकांची आसन व्यवस्था येथे करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या सर्व ६७ उमेदवारांसाठी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक गायकवाड, मुकुल गंधे, आकाश सोनावणे, बाबासाहेब सानप, सुजय मोहिते, रुद्रेश आंबाडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

 


0/Post a Comment/Comments