शेअर ट्रेडिंग मध्ये केडगावच्या डॉक्टरची १ कोटी ६० लाखांची फसवणुक


अहिल्यानगर - व्हाटसअप वर शेअर ट्रेडिंगची माहिती देत गुंतवणुकीवर १० ते २० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत केडगाव मधील डॉक्टरची तब्बल १ कोटी ६० लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणुकीची ही घटना २७ नोव्हेंबर २०२५ ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली असून या प्रकरणी २ जानेवारीला नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत डॉ. चंद्रवदन देवतादिन मिश्रा (वय ६४, रा. बालाजी कॉलनी, अंबिकानगर बसस्टॉप मागे केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी डॉ. मिश्रा यांना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांच्या व्हाटसअप नंबर वर नदीर वर्मा नावाच्या व्यक्तीने मेसेज करून वर्मा इन्व्हेस्टमेंट क्लब इंटर्नशीप ग्रुप टीम ए या ग्रुपला जॉइंट होण्यास सांगितले. फिर्यादी त्या ग्रुप मध्ये जॉइंट झाल्यावर त्यांना शेअर ट्रेडिंगची विविध प्रकारची फसवी व दिशाभूल करणारी माहिती पाठविण्यात आली. 

ट्रेडिंगच्या नावाखाली तुम्ही आयपीओ मध्ये गुंतवणुक केल्यास तुम्हाला १०० टक्के रिटर्न देण्याची व ट्रेडिंग मध्ये १० ते २० टक्के परतावा देण्याचे अमिष देवुन लिंकद्वारे एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. सदर अॅपवर होणारे प्रॉफीटबाबत खोटी माहीती दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. सदर आरोपीच्या अमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी  माझी १ कोटी ६० लाख ४० हजार रुपयांची रक्कम ट्रेडिंग साठी आरोपीने सांगितलेल्या वेगवेगळ्या बैंक खात्यात ऑनलाईन पाठविली.

त्यानंतर आश्वासन दिल्याप्रमाणे फिर्यादीने गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर कोणताही नफा दिला नाही तसेच फिर्यादीची गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत न करुन फिर्यादीची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉ. मिश्रा यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी वर्मा इन्व्हेस्टमेंट क्लब इंटर्नशीप ग्रुप टीम ए या ग्रुपचा अॅडमीन व्हॉटसअॅप मोबाईल नंबर धारक नदीर वर्मा याच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१८ (), ३३६ () (), माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ () प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments