नगरमध्ये शिवसेनेच्या ३ उमेदवारांनी ऐनवेळी 'असा' केला घोळ, शहर प्रमुखांनी केला गौप्यस्फोट



अहिल्यानगर - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आधी 24 उमेदवार होते, आता 21 झाले, म्हणजे 3 कमी झाले. त्याची कारणे शहरप्रमुख किरण काळे यांनी सविस्तर सांगितली आहेत. सुनिता संजय कोतकर, प्रभाग 16 ब यांनी आमचा आणि शिंदे सेनेचा एबी फॉर्म लावला होता त्यांनी आमचा अर्ज मागे घेतला. भाजपचे माजी नगरसेवक भैय्या परदेशी यांचे सख्खे बंधू कल्पेश परदेशी, प्रभाग क्रमांक 11 ड  यांनी शेवटच्या क्षणी आमचा एबी फॉर्म लावून अर्ज दाखल केला, मात्र त्यांनी तो आज मागे घेतला. गौरव ढोणे, प्रभाग क्रमांक 10 अ - अपक्ष म्हणून राहिलेला अर्ज मागे घेण्यात आला. 

कसा झाला घोळ ...

"गौरव ढोणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना पक्षाने दिलेला एबी फॉर्म जोडलाच नाही. छाननी नंतर त्यांचे नाव अपक्ष म्हणून समोर आल्यानंतर पक्षाने निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेत विचारणा केली असता, त्यांनी दाखवलेल्या पोच पावतीवर ढोणे व निवडणूक निर्णय अधिकारी यांची सही आढळून आली. त्यावर एबी फॉर्म जोडलेला नाही, शौचालयाचा दाखला, तसेच ना देयके सादर केलेली नाहीत. ती ३१ तारखेला सकाळी ११ वाजेपर्यंत दाखल करावेत असे सूचित करण्यात आले होते. यातून स्पष्ट होते की, ढोणे यांना पक्षाने दिलेला एबी फॉर्म जोडलाच नाही. ढोणे यांनी जाणीवपूर्वक ही बाब पक्षापासून लपवून ठेवली. विचारणा केल्या नंतर उडवा उडवीची उत्तरे दिली. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविणार असून पुढील योग्य ती कारवाई केली जाईल. 

प्रभाग 11 ड मध्ये भाजपचे माजी नगरसेवक भैय्या परदेशी यांचे सख्खे बंधू कल्पेश परदेशी यांच्या मागणीवरून ठाकरे शिवसेने कडून ऐनवेळी उमेदवारी दाखल करण्यात आली होती. पक्षाला कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. ते मॅनेज झाले. विकाऊ लोकांना शिवसेनेत थारा नाही.

आमच्या अनेक उमेदवारांवर अर्ज मागे घेण्या करिता सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. प्रचंड मोठ्या रकमांची आमिषं दाखविण्यात आली. परंतु प्रामाणिक शिवसैनिक विकले गेले नाहीत. मायबाप जनतेने त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन मी करतो.

ठाकरे शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी एकाही जागेवरचा विरोधी पक्षाचा उमेदवार बिनविरोध झालेला नाही. ठाकरे शिवसेनेच्या महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवारांच्या विरोधात आमचेच घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ४ तर काँग्रेस पक्षाचे २ उमेदवारांचे अर्ज हे माघारी नंतरही राहिले आहेत. याबाबत दोन्ही पक्षांशी आमची बोलणी सुरू आहे. असे किरण काळे यांनी सांगितले.


 

0/Post a Comment/Comments