अहिल्यानगर – न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नमुद मिळकतीचा वाटप तक्ता मंजुर करून ताबा देण्याचा आदेश तहसिलदार यांच्याकडुन मिळवुन देण्यासाठी तक्रारदाराकडे ७ हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारताना कोपरगाव तहसील कार्यालयातील महसूल सहायक वर्ग ३ श्रीमती अंजना पंडीत पवार (वय ३६ ) यांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई २ फेब्रुवारी रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात करण्यात आली.
मिळकतीचा वाटप तक्ता मंजुर करून ताबा देण्याचा आदेश तहसिलदार यांच्याकडुन मिळवुन देण्यासाठी महसूल सहायक श्रीमती अंजना पवार यांनी तक्रारदाराकडे ७ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांच्या नेतृत्वाखाली पो.कॉ. गजानन गायकवाड, पो.कॉ सचिन सुदुक, पो.कॉ. वैभव सुपेकर, चालक पो.हे.कॉ. हारुन शेख यांच्या पथकाने २ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय परिसरात सापळा लावला. यावेळी श्रीमती पवार यांना तक्रारदाराकडे ७ हजाराच्या लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
लोकसेवक श्रीमती अंजना पवार यांनी तहसिल कार्यालय, कोपरगाव येथे ७ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारून स्वतःच्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करुन स्वतःचा सांपत्तीक फायदा करुन घेण्याच्या हेतुन गुन्हेगारी गैरवर्तन केले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास पोलीस उप अधिक्षक अजित त्रिपूटे करत आहेत.

Post a Comment