अहिल्यानगर महापालिकेत शिवसेना शिंदे गटाच्या स्विकृत सदस्याचा अर्ज फेटाळला, राष्ट्रवादी व भाजपाच्या ५ जणांची निवड


अहिल्यानगर - अहिल्यानगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजितपवार गट) ३ तर भाजपाच्या २ स्विकृत सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यातून नाव देण्यात आलेल्या सदस्याची कागदपत्रे अर्धवट असल्याने तसेच शपथपत्र नसल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला असून आता पुढच्या सभेत शिवसेनेच्या कोट्यातील सदस्याची निवड केली जाणार आहे.

स्वीकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने विकी दादासाहेब जगताप, रेवणनाथ दगडू पवार व बाबासाहेब नागरगोजे यांची निवड करण्यात आली तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने रवींद्र बारस्कर व  विशाल रोहिदास नाकाडे यांची निवड करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आदेश सुरेश जाधव यांचा अर्ज देण्यात आला होता, मात्र अर्जासोबतचे कागदपत्रे अर्धवट असल्याने आणि शपथपत्र नसल्याने तो अर्ज फेटाळण्यात आला आहे. आता पुढच्या सभेत शिवसेनेच्या कोट्यातील सदस्याची निवड केली जाणार आहे.

*स्थायी व 'महिला बालकल्याण'च्या सदस्यांच्या निवडीही जाहीर*  

दरम्यान सकाळी ११ वाजता झालेल्या पहिल्या सभेत स्थायी समिती आणि महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना या सर्वच पक्षांनी नव्या जुनांचा मेळ घातला. स्थायी व महिला बालकल्याण मध्ये काँग्रेस एमआयएमलाही इंट्री करता आली.

महापालिकेच्या राष्ट्रमाता जिजाऊ सभागृहामध्ये सर्वसाधारण सभेला महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते प्रकाश भागानगरे, भाजपाच्या गटनेत्या शारदाताई ढवण शिवसेनेचे गटनेते दत्तात्रय कावरे, एमआयएमचे गटनेते शाहबाज सय्यद, काँग्रेसचे गटनेते शम्स खान यांनी बंद पाकिटामध्ये सदस्यांची नावे महापौरांच्या ताब्यात दिली. त्यानंतर महापौर व उपमहापौर यांनी बंद पाकिटे उघडून सदस्यांची नावे जाहीर केली.

त्यानुसार स्थायी समिती सदस्य राष्ट्रवादी (अजित पवार गट)- गौरी बोरकर, सुरेश बनसोडे, हरप्रीतकौर गंभीर, संध्या पवार, मीना चोपडा, पौर्णिमा गव्हाळे, भाजप - सुभाष लोंढे, बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, मनोज दुल्लम, मनोज कोतकर, सोनाबाई शिंदे, शिवसेना शिंदे गट - नवनाथ कातोरे, सुनिता गेनप्पा, काँग्रेस - खान मीनाज जाफर, एमआयएम -शेख शहनाज खालिद.

महिला व बालकल्याण समिती सदस्य - राष्ट्रवादी (अजित पवार गट)- दिपाली बारस्कर, सुनिता भिंगारदिवे, अनिता शेटीया, काजल भोसले, सुनिता कांबळे, अश्विनी लोंढे, भाजप - वंदना ताठे, शितल ढोणे, पुष्पा बोरुडे, आशाबाई कातोरे, रोशनी त्रिंबके, वर्षा सानप, शिवसेना शिंदे गट - मंगल लोखंडे, रूपाली दातरंगे, काँग्रेस -खान मीनाज जाफर, एम आय एम -शेख शेहनाज खालिद यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

या दोन्ही सभांसाठी महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, नगर सचिव मेहेर लहारे यांच्या सह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

हे ही वाचा ...

प्रदर्शनाच्या एक दिवस आधी ‘द केरळ स्टोरी 2’ला हायकोर्टाचा मोठा झटका  

तुळशीचे रोप लावताना लक्षात ठेवा हे नियम! नशीब बदलेल

0/Post a Comment/Comments