पाथर्डी - दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास कॉपी देण्यास विरोध केल्याने होमगार्ड कृष्णा वांडेकर यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन पळवून नेल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालयात २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कृष्णा वांडेकर हे तिसगाव येथील वृद्धेश्वर हायस्कूलच्या पाठीमागच्या बाजूने दहावीच्या पेपरच्या वेळेला कर्तव्यवर हजर होते. दोघेजण मोटारसायकलवर कॉपी देण्यासाठी येथे आले, त्यावेळी कृष्ण वांडेकर यांनी त्यांना सांगितले की, तुम्ही येथून जा, कॉपी देऊ नका, याचा राग आल्याने तू आम्हाला ओळखत नाहीस, गणेश सचिन शिंदे व रोहित दिलीप खंदारे यांचे नाव तू ऐकले नाहीस का?, आम्ही तिसगावचे दादा असून, तू आम्हाला कॉपी द्यायला विरोध करू नको, असे म्हणत शिंदे व खंदारे यांनी वांडेकर यांना मारहाण केली.
या वेळी खंदारे याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची एक तोळ्याची चेन ओढून नेली. यावेळी तेथे असलेले त्यांचे इतर सहकारी तातडीने धावले, त्यामुळे या दोघांनी तेथून पळ काढला. होमगार्ड वांडेकर हे शासकीय काम करीत असताना त्यांच्या कामात अडथळा आणून चेन हिसकावून मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनीगणेश सचिन शिंदे व रोहित दिलीप खंदारे (दोघे रा. तिसगाव, ता. पाथर्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा ...
‘धुरंधर २’ मध्ये दिसणार 'हा' सर्वांत मोठा बदल; १९ मार्चला होणार प्रदर्शित

Post a Comment