अहिल्यानगर - अहिल्यानगर शहरातील अल्पवयीन प्रेमीयुगुल पळून गेले होते. मात्र, त्यांनी आत्महत्येचा निश्चिय केला होता. ही बाब पोलिसांना समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्परता दाखवत तांत्रिक तपासाच्या आधारे त्या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी मन परिवर्तन करून दोघांना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले.
तोफखाना पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी अपहरणाची फिर्याद दिली होत. फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी (वय १६) अहिल्यानगरमधील एका कॉलेजमध्ये इयत्ता १२ वीमध्ये शिक्षण घेत असून, ती मैत्रिणीसोबत राहण्यास होती. अल्पवयीन मुलगी ही रात्रीचे वेळी जेवण करून फेरफटका मारण्यासाठी रूमचे बाहेर गेली असता तिस अज्ञात आरोपीने कशाचे तरी अमिष दाखवून पळून नेले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार दीपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, भिमराज खर्से, प्रशांत राठोड, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, महिला पोलिस अंमलदार ज्योती शिंदे, सोनल भागवत यांचे पथक तयार करून अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्याबाबत रवाना केले. पोलिस पथकाने अपहृत मुलीचे नातेवाईक, मैत्रिर्णीकडे विचारपूस केली.
दि. १९ फेब्रुवारी रोजी अपहृत अल्पवयीन मुलीची व आरोपीची व्यावसायिक कौशल्याचे आधारे माहिती काढत असताना पीडित मुलगी ही जालना येथे पळून जाणार असून, सध्या ती मुलासोबत नेवासा बसस्थानक परिसरात आहे. त्यानुसार पोलिसांनी नेवासा बसस्थानक परिसरात सापळ रचून दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांची इंस्टाग्राम या सोशल मीडियावर ओळख होऊन प्रेमात रुपांतर झाले होते. ते वैयक्तिक कारणास्तव पळून जावून आत्महत्या करणार असल्याबाबत समजले होते.
पथकाने ताब्यातील अल्पवयीन अपहत मुलगी व विधिसंघर्षात बालक यांचे मत परिवर्तन करून त्यांना तपासकामी तोफखाना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.
हे ही वाचा ...
‘धुरंधर २’ मध्ये दिसणार 'हा' सर्वांत मोठा बदल; १९ मार्चला होणार प्रदर्शित

Post a Comment