भाजपच्या कार्यकारिणीत सुप्रिया सुळे यांच्या होणाऱ्या व्याहींचा समावेश; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण



मुंबई - भारतीय जनता पक्षाने (भाजप) जाहीर केलेल्या नव्या राज्य कार्यकारिणीत एक महत्त्वाची आणि चर्चेची नोंद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबीयांशी नाते जोडले जाणाऱ्या व्यक्तीचा भाजपच्या कार्यकारिणीत समावेश करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखानी यांनाही भाजपाच्या नव्या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. अरुण लखानी यांची पक्षाच्या सहकोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर या बहुप्रतिक्षित प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहर्‍यांना सुद्धा संधी मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली.

यासोबतच, आमदार गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी टाकली आहे. केशव उपाध्ये यांनाही कार्यकारिणीत बढती दिली असून, यापुढे भाजपाच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी नवनाथ बन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर अरुण लखानी यांची सहकोषाध्यक्षपदी निवड करण्याता आली आहे.

तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर प्रदेश कार्यकारिणी, पदाधिकार्‍यांची नेमणूक करावी असे ठरले होते. काही महिने पदाधिकारी नेमणुकांबाबत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांसोबत चर्चा झाल्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

हे ही वाचा ... 

प्रसिद्ध मराठी अभिनेता पडला मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात

0/Post a Comment/Comments