नवी दिल्ली - दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी राऊज ॲव्हेन्यू कोर्टाकडून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह एकूण २२ जणांची यातून निर्दोष मुक्तता केलीये. या सुटकेनंतर अरविंद केजरीवाल मिडीयासमोर ढसाढसा रडले.
मीडियाशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, मी माझ्या आयुष्यात केवळ ईमानदारी कमावली आहे. भाजपाने माझ्यावर खोटे आरोप लगावले होतो. मात्र आज कोर्टाने सांगितलं की, केजरीवाल आणि सिसोदिया हे भ्रष्टाचारी नसून ईमानदार आहेत.
राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने निकाल देताच माजी मुख्यमंत्री केजरीवाल मिडीयासमोर आले. यावेळी त्यांनी, मी भ्रष्ट नाही. आज कोर्टानेच हे स्पष्ट करत मला इमानदार असल्याचं म्हटलंय.
केजरीवाल यांनी पुढे सांगितलं की, भाजपा दीर्घकाळापासून मद्याचा घोटाळा-घोटाळा करत होती. मात्र ते खोटं असल्याचं आता समोर आलंय. आज सत्याचा विजय झाला आहे. मला पहिल्यापासूनच न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. माझ्या आम आदमी पक्षाला पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अमित शहांनी सर्वात मोठा राजकीय कट रचला होता. त्यांनी आपच्या पक्षाच्या पाच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकलं. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी केजरीवाल भ्रष्टाचारी आहेत असा आरोप करण्यात, पण मी भ्रष्टाचारी नाही, असं म्हणताना केजरीवालांना अश्रू अनावर झाले.
दिल्लीतील राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना दिल्ली एक्साइज पॉलिसी केसमध्ये निर्दोष मुक्त करण्यात आलंय. २०२२ मध्ये दिल्ली मद्य धोरणात गैरप्रकार झाल्याचा आरोप तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात करण्यात आला होता. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यासह २३ जणांची नावं आरोपपत्रात दाखल करण्यात आली होती.
हे ही वाचा...
मध्यरात्री हवाई हल्ला, 55 सैनिकांचे मृतदेह पाहून पाकिस्तान हादरला
अभिनेत्रीवर 127 किलो सोन्याच्या तस्करीचा आरोप, ईडीची मोठी कारवाई

Post a Comment