पारनेर - पारनेर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने टाकळी ढोकेश्वर येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे. पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय राजपत्राद्वारे जाहीर झाला आहे.
या नव्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात टाकळी ढोकेश्वर, सावरगाव, ढोकी, नांदुर पठार, कर्जुले हर्या, काटाळवेढा, वनकुटे, पळसपुर, मांडवे खुर्द, कासारे, खडकवाडी, म्हसोबाझाप, देसवडे, वारणवाडी, वासुंदे, गारगुंडी, वडगाव सावताळ, ढवळपुरी, पळशी, काकणेवाडी, पोखरी, हिवरे कोरडा, पिंपळगाव रोठा, माळकुप, अक्कलवाडी, काळकुप, तिखोल, भनगडेवाडी, कारेगाव, डोंगरवाडी, धोत्रे खुर्द, भोंद्रे, धोत्रे बु., तास, गाजदीपूर अशी ३५ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
तसेच या निर्णयामुळे पारनेर पोलीस ठाण्यावरील ताण कमी होऊन पारनेर, विरोली, पुणेवाडी, हातलखिंडी, सिद्धेश्वरवाडी, बहिरोबावाडी, पानोली, कान्हुरपठार, वडुले, पिंपळगाव तुर्क, राळेगणसिद्धी, पिंपळनेर, वडगाव दर्या, भांडगाव, वेसदरे, वडगाव आमली, पिंप्री पठार, दैठणे गंजाळ, शेरी कोलदरा, सारोळा आडवाई, निघोज, किन्ही, जामगाव, गांजीभोयरे, लोणी हवेली, पिंप्री जलसेन, शिरापुर, सांगवीसूर्या, चोंभुत, जवळा, रेनवडी, गुणोरे, पाडळी आळे, गाडीलगाव, कळस, राळेगण थेरपाळ, आळकुटी, हाकीगतपूर, माजमपूर, म्हस्के वाडी, कोहकडी, शेरीकासारे, मोरवाडी, पाबळ, म्हसे खुर्द, गारखिंडी, दवाणवाडी, वडझिरे, पठारवाडी, लोणी मावळा, चिंचोली, देवीभोवरे, दरोडी, वडगाव गुंड, पाडळी दर्या, शिरसुले, बाभुळवाडे, वडनेर बु., जाधववाडी, भाळवणी, रांधे, गोरेगाव, डिस्कळ, पाडळी तर्फे कान्हुर, कुरुंद, करंदी या ६६ गावांतील नागरिकांनाही पोलीस सेवांचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे.
यामुळे पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण १०१ गावांतील नागरिकांना कायदा-सुव्यवस्था आणि तक्रार निवारणाच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार असून तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा ...
पौराणिक कथा... समुद्राचे पाणी कोणाच्या शापामुळे खारट झाले !
ना कंगना, ना कियारा; 'ही' अभिनेत्री साकारणार मधुबाला

Post a Comment