'उमेद' च्या माध्यमातून नगर तालुक्यात महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे भूमिपूजन



नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील देहरे येथे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रोजेक्ट अंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या वत्सुरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पडला.

या समारंभाचे उद्घाटन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रकल्प संचालक मंजुषा ठवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेळके, जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप,  ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, तालुका अभियान व्यवस्थापक पंढरीनाथ ठाणगे, तालुका व्यवस्थापक डी. बी. गव्हाणे, व्ही.बी. धनवटे, प्रभाग समन्वयक श्रीमती नवले, श्रीमती दिवटे, सोनाली शिंदे, श्रीमती खेडकर, उमेद तालुका टीम, तसेच वत्सुरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर तालुक्यातील देहरे प्रभागातील एकूण ५७६ महिला सभासदांच्या सहभागातून या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. कंपनीच्या माध्यमातून कांदा साठवणूक केंद्र प्रकल्प उभारण्यात येत असून ग्रामीण भागातील महिलांना स्वतःची उद्योगसंस्था उभारण्याची संधी मिळाली आहे. यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असून शाश्वत आर्थिक उन्नतीची दिशा प्राप्त होणार आहे.

उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या उपजीविका विकासासोबत त्यांच्या आर्थिक व औद्योगिक सहभागात सकारात्मक बदल घडताना दिसत आहे. वत्सुरी महिला शेतकरी उत्पादक कंपनी हा उपक्रम ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असून महिलांच्या सर्वांगीण विकासाकडे टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

हे ही वाचा ...

पौराणिक कथा... समुद्राचे पाणी कोणाच्या शापामुळे खारट झाले !  

ना कंगना, ना कियारा; 'ही' अभिनेत्री साकारणार मधुबाला

 



0/Post a Comment/Comments