जामखेड – जामखेडमध्ये कुख्यात गुंड आणि पैलवान सागर मोहळकर याच्यावर
गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या
रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जामखेड शहरातील नुराणी कॉलनीत बुधवारी (दि. ४) सायंकाळी दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात
आरोपींनी सागरवर गोळ्या झाडल्या. कुख्यात सागर मोहळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोराने
सात राऊंड फायर केले. यापैकी चार गोळ्या अंगात घुसल्याने त्याची प्रकृती गंभीर
आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण
पसरले आहे.
सागर मोहळकर हा कुख्यात गुंड असून
त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कलम 307 नुसार त्याच्यावर
झालेल्या कारवाईनंतर त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. तो
नुकताच कारागृहातून जामीनवर बाहेर आला होता. जामखेड शहर आणि तालुक्यात त्याची
मोठ्या प्रमाणावर दहशत आहे.
गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून
पसार झाले असून पोलिसांनी तातडीने परिसर नाकाबंदी करत तपास सुरू केला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. गोळीबारामागील कारण
वैयक्तिक वैर, गँगवॉर की इतर काही, याचा तपास सुरू
असल्याचे पोलिसांकडून करण्यात येत आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तयार
केली आहे. या घटनेमुळे जामखेड तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा
गंभीर बनला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.
याच सागरने पुण्याचा
कुख्यात गुंड निलेश घायवाळच्या कानाखाली मारली होती. त्यानंतर सागर मोहोळकर हा
चर्चेमध्ये आला होता. घायवळच्या विरोधात सागर मोहोळकर याचे वडिलांनी २
दिवसांपूर्वी जामखेड पूर्णामध्ये गुन्हा दाखल केला होता. सागर मोहोळकर
हा पैलवान असला तरी गुंड आहे. काही वर्षांपूर्वी सागर मोहोळकरला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक
करण्यात आली होती. त्यामुळे तो तुरुंगात देखील होता. जेलमध्ये
गेल्यानंतर सागर तिथेही काही सुधारलाा नाही. त्याने तुरुंगात आणखी एकाचा खून केला
होता. शिक्षा भोगल्यानंतर काही दिवसांनी तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो
निलेश घायवळशी भिडला होता.
हे ही वाचा...

Post a Comment