नांदेड: महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीने वसतिगृहातच गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. शुक्रवारी दुपारी हडको परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून मुलीच्या पालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर, नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच अजित पवार पक्षाचे नेते तथा महापालिका माजी विरोधी पक्ष नेता जीवन घोगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवन घोगरे यांच्याविरोधात आत्महतेस प्रवृत्त केले आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या एका २५ वर्षीय विद्यार्थीनीने वसतिगृहात आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर, मुलीच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी जीवन घोगरे यांनीच संबंधित विद्यार्थीनीस आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, दाखल केलेल्या फिर्यादीतही जीवन घोगरे यांने नाव घेतले आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवन घोगरे यांच्या वसतिगृहामध्ये आकांक्षा गायकवाड ही विद्यार्थिनी राहत होती, गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून त्यांना फीस भरा म्हणून जीवन घोगरे त्रास देत होते. त्यामुळेच, माझ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार मुलीचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी केली आहे.
फी थकवल्याने वसतिगृहचालकाकडून त्रास
आकांक्षा मुंजाजी गायकवाड असं या तरुणीचं नाव आहे. "वसतिगृहाची फीस थकल्याने वसतिगृहचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस जीवन घोगरे हे मानसिक त्रास देत होते, या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली," असा आरोप पीडित कुटुंबीयाने केला. त्यानुसार शुक्रवारी रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा ...
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल?
भारतात असंसर्गजन्य आजारांचे वाढते संकट! काय आहे कारण?

Post a Comment