अहिल्यानगर - महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक ८ ड मधून कुमार बबनराव वाकळे तर प्रभाग क्रमांक १४ अ मधून प्रकाश बाबूराव भागानगरे यांचा समावेश आहे.
प्रभाग ८ ड या सर्वसाधारण जागेसाठी वाकळे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे राहुल लक्ष्मण कातोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र ३१ डिसेंबर रोजी झालेल्या छाननीत कातोरे यांच्या उमेदवारी अर्जावरील अनुोदकाच्या स्वाक्षरीवर आक्षेप घेण्यात आला. अनुोदकाच्या स्वाक्षरीची प्रत्यक्ष पडताळणी झाल्यानंतर ती चुकीची असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला नव्हता.छाननी नंतर वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली, त्यात प्रभाग क्रमांक ८ मधील ड सर्वसाधारण प्रवर्गात फक्त दोन उमेदवार राहिले होते.
त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुमार वाकळे आणि अपक्ष मुरलीधर कोलते या दोघांचे अर्ज मागे राहिले होते. १ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या पहिल्याच दिवशी सकाळी अपक्ष मुरलीधर कोलते यांनी अर्ज मागे घेतला असून या ठिकाणी फक्त कुमार वाकळे यांचा अर्ज राहिला असल्याने ते बिनविरोध निवडणून येणार आहेत.
तर प्रभाग क्रमांक १४ अ या नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जापैकी छाननीत राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे यांच्यासह ४ अपक्ष अशा ५ जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी अपक्ष ऋषिकेश विजय रासकर, मळू लक्ष्मण गाडळकर, अवधूत भगवान फुलसौंदर, हरिष शरद भांबरे या चौघांनी १ जानेवारी रोजी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे तेथे भागानगरे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने ते बिनविरोध निवडून येणार आहेत.
.jpg)
Post a Comment