गांजा तस्करीचा मोठा डाव पोलिसांनी उधळला, २५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त


अहिल्यानगर - गांजा या अंमली पदार्थाचा मोठा साठा एका स्कॉर्पीओ गाडीत घेवून विक्री करण्यासाठी चाललेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि मिरजगाव पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत सापळा लावून पकडले आहे. या दोघांकडून १८ लाख १८ हजार रुपये किंमतीचा १३२ किलो गांजाचा साठा, महिंद्रा कंपनीची स्कॉर्पीओ गाडी २ मोबाईल असा एकूण २५ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गणेश अंकुश कराड (वय ३२), सुखदेव शिवनाथ कदम (वय ३०, दोघे रा.रा. आगसखांड, ता. पाथर्डी) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे.त्या नुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नोडल अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार, ह्रदय घोडके, संतोष खैरे, दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड मनोज साखरे, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे यांचे पथक नियुक्त करून त्यांना कारवाईसाठी पाठविले होते.

सदर पथक हे मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थबाबत माहिती घेत असतांना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, स्कॉर्पीओ गाडी (क्र.एम. एच. १४ जी. एच. २३३०) मधुन दोन इसम अंमली पदार्थ गांजा विक्रीकरीता कर्जत येथुन पाथर्डीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती पो.नि. कबाडी यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नि.विजय झंजाड यांना कळवून संयुक्त कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दोन्ही पथके तात्काळ मिरजगाव ते कर्जत जाणारे रोडवरील ब्रिजखाली महात्मा फुले चौक येथे जावुन सापळा रचुन थांबले. काही वेळातच संशयित स्कॉर्पीओ गाडी येतांना दिसली. दोन्ही पथकांनी गाडी थांबवुन गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये गणेश कराड आणि सुखदेव कदम होते. पोलिसांनी स्कॉर्पीओ गाडीची झडती घेतली असता गाडीचे डिक्कीमध्ये ४ गोण्या मिळुन आल्या. त्यात १३२.८४ किलो ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी गांजा २ मोबाईलव स्कॉर्पीओ गाडी असा एकुण २५ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ. भाऊसाहेब काळे यांनी  दिलेल्या फिर्यादीवरुन मिरजगाव पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हे ही वाचा ...

पाक सैन्याच्या चेक पोस्टवर आत्मघाती हल्ला, ११ सैनिक ठार, भारतावर गंभीर आरोप

सुपरस्टार धनुषसोबतच्या लग्नाबाबत मराठी अभिनेत्री स्पष्टच म्हणाली... 

ईशान किशन टी-20 फलंदाज क्रमवारीत टॉप 10 मध्ये पोहोचला

0/Post a Comment/Comments