अहिल्यानगर - नोकरी देण्याचे आमिष दाखवून आणि ब्लॅकमेलिंग करुन शहराचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी तरुणीवर अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच आता पुन्हा एका तरुणीने अभिषेक कळमकर यांच्या विरोधात धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. नोकरी देण्याच्या आमिषाने नको तेथे हात लावला असल्याचे सांगत तरुणीने तोफखाना पोलिसांत धाव घेतलीय.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान ओळख झाल्यावर नोकरीच्या शोधात असलेल्या २२ वर्षीय तरुणीला माझ्या खूप राजकीय ओळखी आहेत. मी तुझे नोकरीचे काम करतो असे म्हणत चल आपण कॉफी घेवू असे सांगून त्या तरुणीला गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेले. तेथे प्रचारादरम्यान मला तू खूप आवडली होतीस असे म्हणत… नको तेथे हात लावला. नको ते बळजबरीने केले. तसेच तू जर कोठे बोलली तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून शिवीगाळ केली असे पिडित तरुणीने म्हटले आहे.
अभिषेक कळमकर वर दाखल झालेल्या अत्याचाराच्या बातम्या वाचून आणि व्हिडीओ पाहून आपण तक्रार देण्याचे धाडस केले आणि आज मंगळवारी (दि.२४) तोफखाना पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिल्याचे या तरुणीने म्हंटले आहे. तसेच त्यास लवकरात लवकर अटक करावी अशी मागणीही तिने केली आहे.
अभिषेक कळमकरच्या घराची पोलिसांकडून झडती
दरम्यान अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यापासून कळमकर फरार आहेत. पोलिसांची दोन पथके त्यांच्या मागावर आहेत. हा गुन्हा तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून मंगळवारी (दि.२४) सकाळी पोलिसांनी अभिषेक कळमकर यांच्या घराची घडती घेतली. यावेळी पोलिसांनी काही कागदपत्रे आणि इलेक्टॉनिक वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. तरुणीवर अत्याचार करणार्या अभिषेक कळमकर यांना अटक कधी असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
हे ही वाचा ...

Post a Comment