पुणे - महाराष्ट्रातून गेल्या काही दिवसांपासून थंडी हळूहळू
कमी होत आहे. थंडीचा प्रभाव ओसरला असून कडाक्याच्या उन्हामुळे तापमानात मोठी वाढ
झाली आहे. मात्र, याच काळात हवामान विभागाने पावसाचा
इशारा दिलाय. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते
तीन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता
वर्तवण्यात येते आहे. परस्परविरोधी वाऱ्यांच्या स्थितीमुळे वातावरणात हा बदल होत
असून उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
संक्रातीनंतर महाराष्ट्रातील थंडीचा प्रभाव हळूहळू कमी झाला
आणि तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला. आता हवामान विभागाकडून पावसाचा इशारा
देण्यात आला आहे. पुढील दोन-तीन दिवसांत वातावरणात बदल होऊन उकाड्यापासून काहीसा
दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने रविवारी (दि.२२) सकाळी इशारा दिला असून
त्यानुसार पुणे, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, बीड, जालना
आणि सांगली या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सोमवारी
अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही
ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर मंगळवारी सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव
जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या
पावसाचा अंदाज आहे.
त्याचसोबच
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या
गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. या अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे बळीराजा चिंतेत आला
आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यात
अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कांदा, गहूसह अन्य पिकांना फटका
बसण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
हे ही वाचा ...
ऐन रमजानमध्ये पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; १७ जणांचा मृत्यू

Post a Comment