अहिल्यानगर
- श्रीगोंदा शहरातील गोदडे महाराज मठाजवळील 'साईसेवा
फुटवेअर' या चपलांच्या दुकानात सुरू असलेल्या गांजा या अंमली
पदार्थाच्या अवैध विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने
संयुक्त छापा टाकला आहे. या कारवाईत दुकानातून दोन किलोहून अधिक वजनाचा गांजा जप्त
करण्यात आला असून, एका आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.
नगर
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन
यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष
मुटकुळे यांनी स.पो.नि. हरिष भोये आणि पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, प्रताप देवकाते, अमोल
कोतकर, बाळासाहेब गुंजाळ, सतीष भवर,
भगवान धुळे यांचे एक विशेष पथक तयार केलेले आहे.
हे पथक
१५ ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, सागर अविनाश बोराडे (रा. लोहार गल्ली,
श्रीगोंदा) हा गोदडे महाराज मठाजवळील त्याच्या 'साईसेवा फुटवेअर' दुकानामधून गांजाची विक्री करत
असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. या माहितीची खात्री करून पथकाने श्रीगोंदा
पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांना लेखी अहवालाद्वारे माहिती कळवली.
त्यानंतर कर्जत उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. कौशलराम.वाघ, स्थानिक
गुन्हे शाखेचे पथक आणि महिला पोलीस शोभा कुरूळे यांनी संबंधित दुकानावर छापा
टाकला.
पंचासमक्ष
'साईसेवा फुटवेअर' दुकानाची पाहणी केली असता, एका कापडी पिशवीमध्ये
अमली पदार्थ गांजा आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी सागर अविनाश बोराडे
(वय ३४, रा. लोहारगल्ली, श्रीगोंदा)
यास ताब्यात घेतले. आरोपीच्या दुकानातून १ लाख ८ हजार ३५० रुपये किमतीचा २ किलो
१६७ ग्रॅम वजनाचा गांजा आणि ५० रुपये किमतीची कापडी पिशवी असा एकूण १ लाख ८ हजार
४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या आरोपीकडे
कसून चौकशी केली असता, त्याने
हा गांजा अक्षय (पूर्ण नाव माहीत नाही,
रा. चौंडी, ता. जामखेड - फरार) याच्याकडून
विकीसाठी आणल्याची माहिती निष्पन्न झाली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात
गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे
कलम ८(क), २०(ब)(ii) प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा ...
सेवा संकल्प अभियानातून २७३ अति तीव्र कुपोषित बालकांच्या पोषणाची जबाबदारी अधिकाऱ्यांकडे
अहिल्यानगरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु, ‘या’ ठिकाणाहून आले आहेत १०० भावी डॉक्टर

Post a Comment