मुंबई - राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजेच सात जागा रिक्त होणार आहेत. त्यानुसार आता भाजपाकडून महाराष्ट्रातील जागांसाठी आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांचे नाव राज्यसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आले आहे. २०१९ नंतर संसदीय राजकारणापासून दूर गेलेल्या विनोद तावडेंचे यानिमित्ताने पुनरागमन होत आहे. या मध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली
राज्यसभा निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून पक्षाने रामदास आठवले, विनोद तावडे, नागपूरच्या माजी महापौर माया चिंतामण ईवनाते आणि हिंगोलीचे माजी आमदार रामराव वडकुते यांना भाजपने राज्यसभेसाठी संधी दिली आहे. रामदास आठवले यांना भाजपने राज्यसभेसाठी पुन्हा संधी दिली आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या पत्ता कट करत भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चेतील कोणालाही संधी नाही. याशिवाय राज्यभरातील अनेकांना धक्का देण्यात आला आहे.
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक
५ मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
६ मार्च – अर्जांची छाननी
९ मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
१६ मार्च – सकाळी ९ ते सायं. ४ मतदान; सायं. ५ नंतर मतमोजणी
हे ही वाचा ...
भारतीय विद्यार्थिनीचा टेक्सासमध्ये मृत्यू, क्षणात स्वप्नांचा चुराडा...
गौतमी पाटील पुन्हा चर्चेत, सोशल मिडीयावर होतेय तुफान व्हायरल...
युद्धामुळे वाढलं भारतातील शेतकऱ्यांचं टेन्शन, नेमकं काय काय होणार?

Post a Comment