अहिल्यानगर - बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित आहे. तर राहुरीत दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्या नावाची चर्चा आहे. आता भाजपचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरीतील उमेदवारासंबंधी मोठे वक्तव्य केले आहे.
डॉ. विखे म्हणाले, येत्या १० किंवा १२ मार्च पर्यंत राहुरी व बारामतीची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. राहुरीतून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनी माझ्याकडे ज्या भावना व्यक्त केल्या, त्या मी वरिष्ठांना कळविल्या आहेत. बारामती आणि राहुरीची पोट निव़डणूक एकाचवेळी होणार आहे. दोन्ही जागा नेत्यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीने सामंजस्याने तोडगा काढून दोन्ही ठिकाणची निवडणूक बिनविरोध करावी, असे आमचे आवाहन आहे. असेही ते म्हणाले.
हे ही वाचा ...
भारतीय विद्यार्थिनीचा टेक्सासमध्ये मृत्यू, क्षणात स्वप्नांचा चुराडा...
गौतमी पाटील पुन्हा चर्चेत, सोशल मिडीयावर होतेय तुफान व्हायरल...
युद्धामुळे वाढलं भारतातील शेतकऱ्यांचं टेन्शन, नेमकं काय काय होणार?

Post a Comment